ससून सर्वोचार रुग्णालय पुणे अंतर्गत वर्ग – 04 पदांच्या तब्बल 354 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ससून सर्वोचार रुग्णालय पुणे अंतर्गत वर्ग – 04 पदांच्या तब्बल 354 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sasun Hospital pune Recruitment for class 4 post , number of post vacancy – 354 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.गॅस प्लँट ऑपरेटर01
02.भांडार सेवक01
03.प्रयोगशाळा परिचर01
04.दवाखाना सेवक04
05.संदेशवाहक02
06.बटलर04
07.माळी03
08.प्रयोगशाळा सेवक08
09.स्वयंपाकी सेवक08
10.नाभिक08
11.सहायक स्वयंपाकी09
12.हमाल13
13.रुग्णपटवाहक10
14.क्ष-किरण सेवक15
15.शिपाई02
16.पहारेकरी23
17.चतुर्थश्रेणी सेवक36
18.आया38
19.कक्षसेवक168
 एकुण पदांची संख्या354

आवश्यक अर्हता :  उमेदवार हे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा : दि. 31.08.2025 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ / खेळाडु प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) पदांच्या 210 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.08.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment