सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central bank of india recruitment for apprentice post ,  number of post vacancy – 4500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( Apprentice ) पदांच्या एकुण 4500 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या तब्बल 2423 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 800/- + जीएसटी तर मागास / महिला प्रवर्ग करीता 600/- रुपये + जीएसटी तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 400/- रुपये + जीएसटी अशी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment