केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये विविध अधिकारी ग्रेड I च्या 1,007 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS BANKING SECTOR OFFICER POST MAHABHARATI ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आयटी अधिकारी203
02.ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी310
03.राजभाषा अधिकारी78
04.विधी अधिकारी56
05.एचआर / पर्सोनेट अधिकारी10
06.मार्केटिंग अधिकारी350
 एकुण पदांची संख्या1007

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक / संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी

पद क्र.02 साठी : कृषी क्षेत्र / पशुवैद्यकीय क्षेत्र समकक्ष क्षेत्रांमध्ये शेती अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण .

पद क्र.03 साठी : इंग्रजी विषय घेवून हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.04 साठी : LLB

हे पण वाचा : बीड , अहिल्यानगर , छ.संभाजीनगर येथे अधिकारी , लिपिक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.05 साठी : पदवी , पर्सनल व्यवस्थापक / औद्योगिक संबंध / मानव संसाधन विकास / मानव संसाधन / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा .

पद क्र.06 साठी : पदवी , एमएमएस ( मार्केटिंग / एमबीए / PGDBA / PGDM / PGPM

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.07.2025 करीता उमेदवाराचे वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन  https://ibpsonline.ibps.in/  या संकेतस्थळावर दिनांक 21.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment