महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग मार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे . या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दिनांक 29 जुलै 2025 रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत , निर्णय घेण्यात आले आहेत .
सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई तसेच कारागृह विभागातील करागृह शिपाई संवर्गाची मिळून एकुण 14,114 रिक्त पदे 100 टक्के भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक 30.09.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधुन शिथिलता देण्यात येत आहे .
दिनांक 01.01.2024 ते दिनांक 31.12.2024 या कालावधीत रिक्त असलेली व दिनांक 01.01.2025 ते दिनांक 31.12.2025 या कालावधीत भविष्यात रिक्त होणारी पदांचा पदनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पोलिस शिपाई | 10,908 |
02. | पोलिस शिपाई चालक | 234 |
03. | बॅण्डरमन | 25 |
04. | सशस्त्र पोलिस शिपाई | 2,393 |
05. | कारागृह शिपाई | 554 |
एकुण पदांची संख्या | 14,114 |
सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 04.05.2022 व दिनांक 21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देवून पोलिस शिपाई भरती सन 2024-25 भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे .
Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…